Tuesday, 12 January 2016

PPT तयार करण्याची सूत्रे

पावरपॉइंट मधे इमेज कशी तयार करावी?


PowerPoint मध्ये इमेज आपण दोन प्रकारे करू शकतो. येथे दिलेली पद्धत स्लाईडवरील ठराविक आकार सिलेक्ट करून त्याचे रुपांतर इमेजमध्ये कसे करावे याविषयी आहे.


  1. हवे ते आकार, टेक्स्ट सिलेक्ट करा.

  2. आकार अगोदर तयार केला नसल्यास Insert मेनूमधून Shapes Insert करून घ्या.

  3. या शेपवर Right click करा.
  4. Save As Picture ऑप्शन निवडा.

  5. फाईल सेव करण्याचे लोकेशन निवडा.

  6. File Name → योग्य फाईलला नाव द्या.

  7. Save as Type → PNG, GIF, JPEG, TIFF योग्य पर्याय निवडा.  (for MORE  Info)

  8. Save बटण क्लिक करा.

  9. सेव फाईलची लोकेशन निवडून इमेज पहा.

  10. या पद्धतीने कमी वेळात अधिक आकर्षक इमेज, बटण, आकार, आकृत्या तयार करता येतात.

पावरपॉइंट : इमेज इफेक्ट


पावरपॉइंट हे इमेज इफेक्टसाठीही खूप उपयुक्त आहे. अगदी कमी वेळेत तुम्हाला चांगले परिणाम साधता येतात. आणि खूप युजरफ्रेंडलीही...!



Picture Tools मध्ये Format या मेनूमध्ये अनेक उपयुक्त टूल्स व तयार इफेक्ट दिलेले आहेत. चित्र पाहिल्यास हे लक्षात येईल.


टूल्सवर एक नजर आणि थोडक्यात स्पष्टीकरण..
ग्रुपटूल्सस्पष्टीकरण
AdjustRemove Backgroundचित्राची पार्श्वभूमी (बॅकग्राउंड) काढून टाकणे
CorrectionBrightness/Contrast Soften/Sharpen
Colorचित्राचा रंग बदलणे
Artistic Effectविविध कलायुक्त तयार इफेक्ट
Compress Pictureचित्राचे Resolution कमी करणे.
Change Pictureचित्राचे सर्व इफेक्ट कायम ठेऊन चित्र बदलणे.
Reset Pictureचित्र पूर्वस्थितीत आणणे.
Picture Style--चित्राचे विविध तयार स्टाईल्स.
Picture Borderचित्राची बोर्डर सेटिंग्ज
Picture Effectचित्रांचे थ्रीडी व इतर सेटिंग्ज
Picture Layoutचित्र/ चित्रे सिलेक्ट - रुपांतर तयार आकर्षक layout मध्ये.
ArrangeBring Forwardचित्र इतर चित्रांच्या/ ग्राफिक्सच्या पुढे आणणे.
Send Backwardचित्र इतर चित्रांच्या/ ग्राफिक्सच्या मागे नेणे.
Selection paneडायरेक्ट चित्र दिसणे बंद/चालू करणे. चित्र सिलेक्ट करणे.
Alignचित्रांची मांडणी (खूप उपयुक्त)
Groupचित्रांचे ग्रुपिंग करणे.
Rotateचित्र ठराविक अंशात फिरवणे.
SizeCropचित्र कातरणे / नको असलेला भाग काढून टाकणे.
Widthचित्राची रुंदी
Heightचित्राची उंची adjust करणे.

विविध इफेक्ट व त्याची माहिती घेतल्यास लक्षात येईल की फोटोशॉपमधील बरेच काम सोप्या पद्धतीने आपण येथे करू शकतो.
चित्र हे प्रेझेंटेशनमध्ये जसेच्या तसे वापरण्यापेक्षा त्याला आकर्षक इफेक्ट दिल्यास एकजिन्सीपणा वाढेल आणि मोहक कलाकृती तयार होईल.

पहिले चित्र जसेच्या तसे वापरले.
दुसरे Artistic Effect- Blur, तिसरे Color-Blue तर चौथे Artistic Effect- Pastel Smooth कमी वेळात चांगला, तयार तरीही खूप नयनलोभस परिणाम..!

Monday, 11 January 2016

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम- एका दृष्टीक्षेपात

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम- एका दृष्टीक्षेपात



राज्यात पहिली ते आठवीपर्यंतचा एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, या हेतूने शालेय शिक्षण विभागाने "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम‘ जाहीर केला आहे. या विद्यार्थ्यांच्या वर्षातून तीन चाचणी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यंदापासून ही योजना लागू होणार आहे. पहिल्या दोन वर्षांत केवळ भाषा आणि गणिताच्या चाचणी परीक्षा होतील. यातील गुणांनुसार शाळांना श्रेणीही देण्यात येणार आहेत. राज्यात पहिली ते आठवीपर्यंतचा एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, या हेतूने शालेय शिक्षण विभागाने "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम‘ जाहीर केला आहे. या विद्यार्थ्यांच्या वर्षातून तीन चाचणी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यंदापासून ही योजना लागू होणार आहे. पहिल्या दोन वर्षांत केवळ भाषा आणि गणिताच्या चाचणी परीक्षा होतील. यातील गुणांनुसार शाळांना श्रेणीही देण्यात येणार आहेत. यासंदर्भातील "जीआर‘ बुधवारी जारी झाला आहे. हा निर्णय सर्व व्यवस्थापनाच्या सर्व प्रकारच्या शाळांना लागू आहे. तीन चाचण्यांपैकी एक पायाभूत आणि अन्य दोन सत्रांतील चाचण्या असतील. शाळा स्तरावरच त्या घेतल्या जाणार आहेत. 


एक पायाभूत आणि दोन सत्रांत परीक्षा अशा एकूण तीन परीक्षा घेण्यात येतील. याव्यतिरिक्त त्रयस्थ संस्थेच्या सहभागाने प्रथम सत्राअखेर एक आणि दुसऱ्या सत्राअखेर एक अशा दोन रॅण्डम चाचण्या केवळ निवडक शाळांत होतील. या सर्व चाचण्यांचे आराखडे, आयोजन व अंमलबजावणी पुण्यातील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत होईल. या चाचण्या बालकांची समज व क्षमता तपासतील. लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक अशा तिन्ही प्रकारांचा या चाचण्यांत समावेश असेल. या चाचण्या ग्रेडनुसार असतील. विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता आणि संबंधित इयत्तेत अपेक्षित असणाऱ्या मुख्य क्षमता या चाचण्यांद्वारे तपासण्यात येतील. शिक्षकांना सरसकट प्रशिक्षण देणेही यापुढे बंद होणार असून, मागणीनुसारच ते देण्यात येईल. सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने होण्यासाठीही शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे.
पायाभूत चाचणी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी असेल. मागील इयत्तेपर्यंतच्या मूलभूत क्षमता आणि संबंधित इयत्तेच्या प्रमुख क्षमतेवर त्या आधारित असतील. या चाचणीनंतर विद्यार्थ्यांची स्तरनिश्‍चिती करून त्यानुसार गुणवत्ता कार्यक्रम आखण्यात येईल. चाचणी 1 आणि 2 पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. मागील इयत्तेपर्यंतच्या मूलभूत क्षमता आणि पहिल्या सत्राअखेरपर्यंतच्या क्षमतांचे काही प्रश्‍न चाचणी 1 मध्ये असतील. चाचणी 2 मध्ये मूलभूत क्षमता आणि पहिल्या आणि दुसऱ्या सत्राअखेरपर्यंतच्या क्षमतांचे काही प्रश्‍न असतील.
बोलीभाषाविषयक प्रयोग 
राज्यात सुमारे 60 बोलीभाषा आहेत. मराठीखेरीज अन्य भाषक मुलांना शिकण्यात अडचणी येतात. काही शिक्षक यातून मार्ग काढण्यासाठी द्विभाषिक शब्दकोश तयार करतात. शिक्षकांनी मागणी नोंदवल्यास राज्य पातळीवरून द्विभाषिक पुस्तके पुरवण्यात येतील. हा निर्णय सर्व व्यवस्थापनाच्या सर्व प्रकारच्या शाळांना लागू आहे. तीन चाचण्यांपैकी एक पायाभूत आणि अन्य दोन सत्रांतील चाचण्या असतील. शाळा स्तरावरच त्या घेतल्या जाणार आहेत. 

एक पायाभूत आणि दोन सत्रांत परीक्षा अशा एकूण तीन परीक्षा घेण्यात येतील. याव्यतिरिक्त त्रयस्थ संस्थेच्या सहभागाने प्रथम सत्राअखेर एक आणि दुसऱ्या सत्राअखेर एक अशा दोन रॅण्डम चाचण्या केवळ निवडक शाळांत होतील. या सर्व चाचण्यांचे आराखडे, आयोजन व अंमलबजावणी पुण्यातील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत होईल. या चाचण्या बालकांची समज व क्षमता तपासतील. लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक अशा तिन्ही प्रकारांचा या चाचण्यांत समावेश असेल. या चाचण्या ग्रेडनुसार असतील. विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता आणि संबंधित इयत्तेत अपेक्षित असणाऱ्या मुख्य क्षमता या चाचण्यांद्वारे तपासण्यात येतील. शिक्षकांना सरसकट प्रशिक्षण देणेही यापुढे बंद होणार असून, मागणीनुसारच ते देण्यात येईल.
पायाभूत चाचणी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी असेल. मागील इयत्तेपर्यंतच्या मूलभूत क्षमता आणि संबंधित इयत्तेच्या प्रमुख क्षमतेवर त्या आधारित असतील. या चाचणीनंतर विद्यार्थ्यांची स्तरनिश्‍चिती करून त्यानुसार गुणवत्ता कार्यक्रम आखण्यात येईल. चाचणी 1 आणि 2 पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. मागील इयत्तेपर्यंतच्या मूलभूत क्षमता आणि पहिल्या सत्राअखेरपर्यंतच्या क्षमतांचे काही प्रश्‍न चाचणी 1 मध्ये असतील. चाचणी 2 मध्ये मूलभूत क्षमता आणि पहिल्या आणि दुसऱ्या सत्राअखेरपर्यंतच्या क्षमतांचे काही प्रश्‍न असतील.
बोलीभाषाविषयक प्रयोग 
राज्यात सुमारे 60 बोलीभाषा आहेत. मराठीखेरीज अन्य भाषक मुलांना शिकण्यात अडचणी येतात. काही शिक्षक यातून मार्ग काढण्यासाठी द्विभाषिक शब्दकोश तयार करतात. शिक्षकांनी मागणी नोंदवल्यास राज्य पातळीवरून द्विभाषिक पुस्तके पुरवण्यात येतील. 

Sunday, 10 January 2016

मोबाईलमध्ये कॉपी केलेला कंटेंट पीसीमध्ये कसा पेस्ट कराल?

मोबाईलमध्ये कॉपी केलेला कंटेंट पीसीमध्ये कसा पेस्ट कराल?


सध्या मोबाईलवर WhatsApp | Hike | Facebook व इतर मेसेंजर यांचा खूपच वापर वाढला आहे. यामधील चांगले मेसेज कॉपी करून आपल्या संगणकात घेताना फाईलस्वरुपात घ्यावे लागतात. इतर माध्यमातही घेता येत असेल.
पण जर मोबाईलवर कॉपी केलेला डेटा लगेच कॉम्पुटरवर पेस्ट करता आला तर खूप वेगाने काम होईल.
चला खूप सोपे काम आहे हे!

आवश्यक सॉफ्टवेअर :
  • मोबाईलसाठी Airdroid
  • पीसीसाठी फक्त कोणताही Browser

जोडणी:
प्रथम मोबाईल व कॉम्पुटर एकमेकास या सॉफ्टवेअरच्या मदतीने जोडून घ्या.


पद्धत:
  1. मोबाईलवर कोणताही कंटेंट कॉपी करा. (Text)
  2. कनेक्शन पूर्ण झाले असल्यास ब्राउझरवर उजवीकडे ToolBox आहे तेथील Clipboard निवडा.
  3. त्याखाली दिसत असलेल्या काळ्या बॉक्सच्या उजवीकडे रेफ्रेश बटनावर क्लिक करा.
  4. क्षणात तुमचा मेसेज त्याच बॉक्समध्ये येईल.
  5. राईट क्लिक करून Select All निवडा अथवा (Ctrl + A)
  6. सिलेक्ट झालेल्या कंटेंटवर पुन्हा राईट क्लिक करून Copy निवडा. (Ctrl + C)
  7. आता सर्व कंटेंट तुमच्या पीसीच्या क्लीपबोर्डमध्ये आला आहे. तो कोणत्याही एडिटरमध्ये (Notepad / Word) जाऊन पेस्ट (Ctrl + V) करा.
सोपे आहे ना? चला तर लगेच टेस्ट करून पहा.

कॉम्पुटरवर Copy केलेले TEXT मोबाईलवर कसे Paste कराल?



मोबाईल एक उत्तम पोर्टेबल डिव्हाईस आहे. त्यावर टाइपिंग करताना मर्यादा येतात.
कॉम्पुटरवर टाईप केलेले टेक्स्ट कंटेंट जर कॉम्पुटर वर कॉपी केल्या केल्या मोबाईलवर पेस्ट करता आला तर...? किती सोपे काम होईल ना?

अगदी सोपे आहे ते! चला तर मग लगेच सुरुवात करूया...

आवश्यक सॉफ्टवेअर :
  • मोबाईलसाठी Airdroid
  • पीसीसाठी फक्त कोणताही Browser

जोडणी:
प्रथम मोबाईल व कॉम्पुटर एकमेकास या सॉफ्टवेअरच्या मदतीने जोडून घ्या. जोडणी माहित नसल्यास Airdroid च्या मदतीने मोबाईल पीसीला कसा कनेक्ट करावा ते वाचावे.



पद्धत:
  1. Notepad / MS Word अथवा इतर कोणत्याही एडिटरमधून टेक्स्ट कॉपी करून घ्या.
  2. जोडणी पूर्ण झाल्यावर तुमच्या ब्राउझरवर उजवीकडे ToolBox आहे तेथील Clipboard निवडा.
  3. त्याखाली दिसत असलेल्या काळ्या बॉक्समध्ये राईट क्लिक करून तेथे पेस्ट करा.
  4. तेथेच उजवीकडे निळे बटन दिसते तेथे क्लिक करा.
  5. क्षणात Saved to device clipboard असा मेसेज दिसेल.
  6. आता सर्व कंटेंट तुमच्या मोबाईलच्या क्लीपबोर्डमध्ये आला आहे. तो कोणत्याही मेसेंजरमध्ये(अथवा इतर ठिकाणी) जाऊन पेस्ट करा.
खूप सोपे आहे ना? चला तर लगेच करून पहा.

Friday, 8 January 2016

नविन संच मान्यता

शालेय अभिलेखे


    शालेय अभिलेखे



A) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे

1)जनरल रजिस्टर
2)विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
3)शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
4)शाळा सोडल्‍याचा दाखला आवक फाईल,
5)शाळा सोडल्‍याचा दाखला जावक रजिस्टर,
6)वार्षिक निकाल पत्रक रजिष्‍टर
7)जन्म प्रमाणपत्र फाईल,
8)सतत गैरहजर रजिस्टर,
9)शैक्षणिक सर्वे रजिस्टर,
10)आरोग्‍य तपासणी रजिष्‍टर
11)पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
12)निकाल रजिस्टर,
13)मूल्यमापन नोंदवही,
14)बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
15)अपंग विद्यार्थी रजिस्टर
16)पालक संपर्क रजिस्टर,
17)आरोग्य तपासणी रजिस्टर,
18)आरोग्य तपासणी कार्ड फाईल,
19)परीक्षा पेपर फाईल
B) शिक्षकांसंबंधी अभिलेखे

1)शिक्षक वैयक्तिक माहिती रजिस्टर
2)शिक्षक हजेरी रजिस्टर
3)भ. नि. निधी रजिस्टर,
4)शिक्षक  रजेचे रजिस्टर, व रजा अर्ज फाईल,
4)शिक्षक सुचना रजिस्टर,
5)शिक्षक हालचल रजिस्टर,
6)पाठ टाचण वही,
7)वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर,
8)शैक्षणिक साहित्य देवघेव रजिस्टर  
9)पगारपेड रजिस्टर,
10)पगारपत्रक फाईल,
11)मुख्याध्यापकांचे लॉगबुक
C) आर्थिक अभिलेखे

1)सादील कँशबुक
2)सादील खर्च पावती फाईल,
3)सादील लेजरबुक,
4)स.शि.अभियान  कँशबुक
5)स.शि.अभियान खर्चाची पावती फाईल,
6)स.शि.अभियान.लेजरबुक,,
7)शाळा सुधार फंड  कँशबुक
8)शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
9)उपयोगीता प्रमाणपत्र फाईल 



Dकार्यालयीन इतर अभिलेखे 

1)३० सप्टेंबर EMIS / U -DISE  माहिती फाईल 
 2)३१ मार्च सांख्कीय माहिती
 3)फाईल पदभार देवघेव रजिस्टर 
 4)शालेय प्रतवारी
 5)वार्षिक कार्य योजना ( AWP &B ) 
6)शाळा विकास आराखडा 
परिपत्रकेआदेश फाईल



Eशासकीय योजना अभिलेखे

1)सावित्री बाई दत्तक पालक योजना रजिस्टर 
2)शालेय पोषण आहार दैनदीन नोंद  रजिस्टर,
3)शालेय पोषण आहार  चव रजिस्टर 
4)शालेय पोषण आहार धान्य साठा  रजिस्टर
5)शालेय पोषण आहार पावती फाईल 
6)मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
7)मोफत गणवेश वाटप रजिस्टर 
8)लेखन साहित्य वाटप रजिस्टर,
9)उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
10)उपस्थिती भत्ता देयके फाईल,
11)शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर

Fमालमत्ता नोंद

1)डेडस्टॉक रजिस्टर नमुना नं ३२
2)स्थावर मालमत्ता नोंद रजिस्टर

ज्ञानरचनावाद?????????? वाचा

                                                             



                                                                  ज्ञानरचनावाद                                                

 
अलीकडे ज्ञानरचनावाद   हा शब्द  शिक्षणप्रक्रियेत अनेक वेळा वापरला जात आहे .हा ज्ञानरचनावाद एकदम आला कोठून ? इ . प्रश्न आपल्या  मनात येतात .राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF२००५) याचा तो पाया आहे ‘त्याच प्रमाणे बालकांचा मोफत व सक्तीचा  शिक्षणाचा हक्क अधीनियम   2009 (RTE ) मधील कलम  २९ मधेही ज्ञानरचना वादाची तत्त्वे आढळतात. त्यामुळे त्याची ओळख करून घेणे व वर्गाध्यापनामध्ये  त्याचा  जास्तीत जास्त वापर  करणे  प्रत्येक शिक्षकाचे आद्य कर्त्यव्य आहे .        आपण  नव्या अनुभवांना सामोरे जातांना त्या अनुभवाच्या आशयांचा आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे  अर्थ लावून  आपण जगत  असलेले  विश्व समजवून  घेणे , या भूमिकेवर ज्ञानरचनावादी तत्त्वज्ञान आधारलेले आहे .       ज्ञानरचनावादी  शिक्षण  प्रक्रियेसंदर्भात प्रामुख्याने पियाजे ,जोहन ड्य़ूई,वायगोटस्की ,ब्रुनर आणि यांच्या विचारंशी  साम्य असलेल्या  आणखी  काही शास्त्रज्ञानी आपले  विचार मांडलेले आहेत .      ज्ञानरचनावादाची प्रस्तुती  वेगवेगळ्या शब्दात विविध तज्ञांनी केली असली तरी त्यात कोठेही  विरोधाभास  आढळत नाही .त्या  सर्व तज्ञ्यांच्या विचार नुसार  ज्ञानरचना वादाची  काही प्रमुख  तत्वे  आपणास सांगता येतील .. ज्ञान हे स्थिती शील static नसून गतिशील DYANAMIC आहे .. मनुष्य स्वतः शिकत असतो ,आपल्या ज्ञानाची रचना करत असतो .. पूर्वानुभवाच्या  आधारे  मनुष्य  ज्ञान रचना करतो . . सामाजिक , भाषिक व सांस्कृतिक आंतरक्रीयेद्वारे ज्ञानाची निर्मिती होते .. स्थानिक  परिस्थितीचा / परिसराचा  मोठा वाट ज्ञान रचनेत असतो.           ज्ञानरचानावादी  अध्ययन –अध्यापनासाठी  या  तत्त्वांचा समावेश वर्गातील  अध्यन –अध्यापन प्रक्रीये मध्ये करावा लागेल . त्यासाठी प्रथम आपण वर्गातील ज्ञानरचनावादी  अध्ययन- अधायापन   प्रक्रिया समजून घेऊ .
                    ज्ञानरचनावादी वर्गाध्यापन
 ज्ञानरचनावादी विचारसरणीनुसार नुसार शिकण्याची प्रक्रिया पुढील  तीन बाबीच्या  सम्यन्व्यातून घडून येते .
पूर्व ज्ञानशिकवण्याची प्रक्रिया  हि सतत  चालणारी प्रक्रिया आहे. त्यानुसार  या संज्ञेचा  अर्थ  बालक  विशिष्ट नवीन  घटक शिकण्यापूर्वी  त्या घटका संदर्भातील त्याची  आधीचीसमज  असा घेता येईल . वर्गातील प्रक्रियेत  शिक्षकाला  मुलाच्या पूर्वज्ञानाचा  विचार करून  अध्ययन – अनुभवाची  निवड व रचना करावी लागेल .
शिकण्याची तयारी       शिकणाऱ्यांची  शिकण्याची  तयारी करण्यासाठी त्याची  शिकण्याची इच्छा  व त्याची पात्रता  या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे शिकतांना  त्याची भावनिक अवस्था  कशा प्रकारची आहे  हेही  महत्त्वाचे ठरते .भावनिक स्थिरतेतून  भावनिक प्रसन्नतेकडे जाणारी  बालकांची  मन: स्थिती  हि शिकण्यासाठी  योग्य  स्थिती असते .
अध्ययन  अनुभव       बालकाला  ज्या अनुभावाद्वारे  नवीन ज्ञान प्राप्त  होणर असते  तो अध्ययन-अनुभव ; म्हणजे  जो अनुभव  आजवर  त्याने घेतलेला नव्हता असा अनुभव, नवीनता हे त्यांचे वैशिष्ट आहे .या अनुभावाद्वारे नविन माहिती कशा स्वरुपात विद्यार्थ्यांसमोर येते यालाही महत्त्व आहे .अध्ययन –अनुभव जितके संख्येने  जास्त , विषयाला / आशयाला सुसंगत  व समर्पक तेवढा अध्ययनाच्या प्रक्रियेत नेमकेपणा येतो .असे अध्ययन – अनुभव  विचारपूर्वक विद्यार्थांना पुरवणे हि जबाबदारी  शिक्षकाची आहे .    अश्या  प्रकारे  विद्यार्थ्यांचे  पूर्वज्ञान ,त्यांची शिकण्याची तयारी  आणि अध्ययन –अनुभव यांचा  योग्य समन्वय वर्गामधील अध्ययन –अध्यापन प्रक्रियेमध्ये घडवून आणावा लागेल. वर्गामध्ये शिक्षक  जे सांगतील  तसेच विध्यार्थी  करतात .शिक्षक  बोलतात तेच विध्यार्थी  ऐकतात .जोडवर्ग ,मोठे वर्ग , विषयांची  संख्या ,वेगवेगळया चाचण्या ,जोडीला एखादे  दुसरे अशैक्षणिक   काम या परिस्थितीमध्ये  वेळेत “पोर्शन “ संपवायची कसरत शिक्षक करत असतो . या प्रक्रियेत मुलांना  किती  समजले ,त्यांना काय वाटते , कोणती  गोष्ट त्यांना  कठीण जाते , त्यांना  काही अडले  आहे का, यांसारख्या  गोष्टीना  वेळच मिळत नाही  किंवा दिला जात नाही . लहान मुले  उपजतच बहुविध  क्षमतेची  असतात . ती त्यांच्या  अंगभूत क्षमंतानुसार  व गतीनुसार शिकतात  आणि वेगवेगळ्या  पद्धतीने  ज्ञानाच उपयोजन करतात .बालमानसशास्र आणि शिक्षणशास्राने आपल्याला शिकवलेले हे  धडे  वर्गावर्गात  मात्र दूर्लक्षिले  जातात .शालामंध्ये  बहुतेक वेळा व्याख्यानपद्धती ,फलक लेखन , पाठांतर ,सराव .गृहपाठ  या चाकोरीतून जाणे शिक्षकांना  व त्याची सवय झालेल्या विद्यार्थी, पालक , यांना सोयीचे जाते .अशा पदधतीने  अनेक वर्ष  शिक्षणाची प्रकिया  पार पडत आहे .परंतु याचा अंतिम निष्कर्ष मुले खरेच काही शिकतात का? शिकत  नसतील ,तर तो विद्यार्थ्यांचा  क्षमतेचा ,बुद्धीचा  किवा शिक्षकांच्या  कौशल्याचा दोष मानला जातो , परंतु हे कितपत  खरे आहे ? दोष असेल  तर तो “शिकवणे “ या पूर्वापार  चालत आलेल्या  संकल्पनेचा  दोष आहे ; हे आपण लक्षात  घेतले पाहिजे. म्हणूनच  आपण ‘शिकवणे  ‘ यावर  लक्ष  काढून घेऊन ते शिकणे यावर केंद्रित  केले पाहिजे ,ज्ञानरचानावाद हि हेच सांगतो .

Thursday, 7 January 2016

Word: Mail Merge

Word: Mail Merge


एक पत्र अनेक जणांना पाठवण्यासाठी कॉपी पेस्ट करण्याची गरज नाही. त्यासाठी MS Word मध्ये Mail Merge ही सुविधा वापरल्याने भरपूर वेळ वाचतो.

MS Word मधील कोणतेही व्हर्जन चालेल. येथे Word 2013 वापरले आहे.
जे पत्र अनेक जणांना पाठवायचे आहे ते टाईप करून घ्या.
किंवा खालील नमुना कॉपी करून टेस्ट साठी वापरा.



  1. Mailings → Start Mail Merge → Letters निवडा. 
  2. Select Recipients → Type a new list केल्यावर एक विंडो येईल. 
  3. हवी असणारे फिल्ड Customize Columns मधून निवडा. (हा भाग ऑप्शनल आहे.) 
  4. येथे आवश्यक वाटणारे कॉलममध्ये टाईप करा. नवीन ओळीसाठी New Entry वर क्लिक करा. एक ओळ म्हणजे एक प्राप्तकर्ता. यादी पूर्ण झाल्यावर ओके करा. 
  5. जेथे यादीतील नाव हवे तेथे कर्सर न्या. 
  6. Insert Merge Field → मधून फिल्ड insert करा. (स्पेस द्या.) दुसरी फिल्ड insert करा. आवश्यक तेवढ्या फिल्ड insert करून घ्या. 
  7. रिझल्ट पाहण्यासाठी Preview Result वर क्लिक करा. 
  8. Preview Result च्या उजवीकडील नेव्हिगेशन वरून मागे पुढे जा. यादीतील नावाप्रमाणे फक्त प्राप्तकर्ता बदलेल बाकी भाग कायम राहील.

याची प्रिंट काढू शकता.
हीच टाईप केलेली यादी यापेक्षा वेगळी पत्रे प्रिंट करतानाही वापरता येईल. म्हणजे नावांची यादी पुन्हा टाईप करण्याची गरज नाही.
आणखी वेगळे प्रयोग यात करता येतील. शुभेच्छा...!

हा वर्ड फाईल नमुना डाऊनलोड करून पहा. ओपन होताना एक मेसेज येईल त्यास Yes म्हणून ओपन करावे.
(File Size: 15.3 KB, Type:docx, MS Word 2007 & above, Created in MS Word 2013)